कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या
व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व
डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे.
या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात.
कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची अँटिव्हायरल औषधे
अजूनतरी (२०२० साल) उपलब्ध नाहीत.
कोरोनाव्हायरस
प्रथम १९६० च्या दशकात सापडले. सर्वात आधी सापडलेल्यांमध्ये कोंबड्यांमध्ये एक
संसर्गजन्य ब्रॉन्कायटीस विषाणू आणि सामान्य सर्दी असलेल्या दोन रुग्णांमध्ये
(नंतर ह्यूमन कोरोनाव्हायरस २२ E ई आणि ह्यूमन कोरोनाव्हायरस ओसी named43 असे नाव देण्यात आले) होते.
२००३ मध्ये सार्स-सीओव्ही, एचसीओव्ही
एनएल २००४ मध्ये एचकेयू १, २०१९
मध्ये मेर्स-सीओव्ही आणि २०१९ मध्ये एसएआरएस-कोव्ही -२ (पूर्वी 2019-एनसीओव्ही म्हणून ओळखले जाणारे)
या कुटुंबातील अन्य सदस्यांची ओळख पटली आहे. यामध्ये गंभीर श्वसनमार्गाचे संक्रमण
होते.
आकृतिबंध
कोरोना व्हायरस हे कंद आकाराच्या पृष्ठभागाचा
अंदाजानुसार मोठा प्लीओफॉर्मिक गोलाकार कण आहेत. व्हायरस कणांचा व्यास सुमारे
१२०एनएम(NM-Nanometer ) आहे.[१]विद्युतपरमाणु सूक्ष्म आलेखमधील विषाणूचा लिफाफा विद्युतपरमाणु दाट
कवच असलेली एक वेगळी जोडी म्हणून दिसून येते.
कोरोना व्हायरसच्या
संसर्गाची लक्षणे
कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे
कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. काही रुग्णांना वेदना, अनुनासिक रक्तसंचय, वाहणारे नाक, घसा खवखवणे किंवा
अतिसार होऊ शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. काही लोकांना
संसर्ग होतो पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना बरे वाटत
नाही.बहुतेक लोक (सुमारे ८०%) विशेष उपचार न घेता या आजारातून बरे होतात. कोरोना
होणार्या प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ती गंभीर आजारी पडते आणि तिला श्वास घेण्यास
त्रास होतो. वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यासारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांना गंभीर आजार
होण्याची शक्यता असते. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा.[२]
उपचार
1.
या आजारावर निश्चित
असे औषध सध्या उपलब्ध नाही.
2.
दृष्टोत्पत्तीस
आलेल्या लक्षणांवर लाक्षणिक उपाययोजना करतात.
3.
गंभीर अवस्थेत
रुग्णाला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्याची गरज पडू शकते.
२०१९-२०२० वूहान
कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक
२०१९मध्ये कोरोना व्हायरसचा एक उपप्रकार चीनमधील वुहान शहरात आढळून
आला. याला कोव्हिड-१९ असे नाव देण्यात आले. सुरुवातीस वुहान व आसपासच्या प्रदेशात
पसरलेला हा विषाणू त्याच्या इतर उपप्रकारांपेक्षा अधिक तीव्रतेचा असून याने
रोग्यांच्या मरण्याचे प्रमाण मोठे आहे.
१३ मार्च २०२० अखेर जगात १, ३२, ७५८ जणांना या आजाराची लागण झाली असून
एकूण ४९५५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२२ देशांमध्ये हा आजार पसरला आहे. चीनमधील हूबै प्रांतात या आजारामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. हूबै प्रांतातील वूहान शहरातून या विषाणूची लागण सुरू झाली. या आजारामुळे चीन देशात १३
मार्च २०२० अखेर ३१८० जणांचा बळी गेला असून ८० हजार ९९१ जणांना लागण झाली असल्याचे
समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती जारी केली आहे.[३]
करोना व्हायरस आणि
इतर रोग-तुलना
लक्षण
|
करोना
|
नेहमीचे सर्दी-पडसे
|
फ्ल्यू
|
ॲलर्जी
|
....... ताप
|
नक्की
|
क्वचित
|
नक्की
|
कधीकधी
|
कोरडा खोकला
|
नक्की
|
अगदी कमी
|
नक्की
|
कधीकधी
|
श्वसनास त्रास
|
नक्की
|
नाही
|
नाही
|
नक्की
|
डोकेदुखी
|
कधीकधी
|
क्वचित
|
नक्की
|
कधीकधी
|
वेदना
|
कधीकधी
|
नक्की
|
नक्की
|
नाही
|
घशाला सूज
|
कधीकधी
|
नक्की
|
नक्की
|
नाही
|
थकाव
|
कधीकधी
|
कधीकधी
|
नक्की
|
कधीकधी
|
अतिसार
|
क्वचित
|
नाही
|
कधीकधी
|
नाही
|
नाक वाहणे
|
क्वचित
|
नक्की
|
कधीकधी
|
नक्की
|
शिंका
|
नाही
|
नक्की
|
नाही
|
नक्की
|
भारतामध्ये कोरोना
व्हायरस
भारतात
कोविड-१९ (
·
ब
·
च
·
सं
)
मृत्यू बरे झालेले सक्रिय प्रकरणे |
||||
Date
|
प्रकरणांची
संख्या
|
|||
2020-01-30
|
|
1
|
NA
|
|
⋮
|
|
1(=)
|
||
2020-02-02
|
|
2(+1)
|
(+100%)
|
|
2020-02-03
|
|
3(+1)
|
(+50%)
|
|
⋮
|
|
3(=)
|
||
2020-03-02
|
|
6(+3)
|
(+100%)
|
|
2020-03-03
|
|
9(+3)
|
(+50%)
|
|
2020-03-04
|
|
32(+23)
|
(+256%)
|
|
2020-03-05
|
|
33(+1)
|
(+3.1%)
|
|
2020-03-06
|
|
34(+1)
|
(+3.0%)
|
|
2020-03-07
|
|
37(+3)
|
(+8.8%)
|
|
2020-03-08
|
|
43(+6)
|
(+16%)
|
|
2020-03-09
|
|
50(+7)
|
(+16%)
|
|
2020-03-10
|
|
65(+15)
|
(+30%)
|
|
⋮
|
|
65(=)
|
||
2020-03-12
|
|
77(+12)
|
(+18%)
|
|
2020-03-13
|
|
85(+8)
|
(+10%)
|
|
2020-03-14
|
|
100(+15)
|
(+17%)
|
|
2020-03-15
|
|
110(+10)
|
(+10%)
|
|
2020-03-16
|
|
114(+4)
|
(+4%)
|
|
2020-03-17
|
|
140(+26)
|
(+23%)
|
|
2020-03-18
|
|
170(+30)
|
(+21%)
|
|
2020-03-19
|
|
198(+28)
|
(+16%)
|
|
2020-03-20
|
|
249(+51)
|
(+26%)
|
|
2020-03-21
|
|
329(+80)
|
(+32%)
|
|
2020-03-22
|
|
391(+62)
|
(+19%)
|
|
2020-03-23
|
|
468(+77)
|
(+20%)
|
|
2020-03-24
|
|
519(+51)
|
(+11%)
|
|
2020-03-25
|
|
562(+43)
|
(+8%)
|
|
स्रोत: MoHFW and वर्ल्डमीटर्स.
|
दिनांक २२ मार्च २०२० पर्यंत भारतातील कोरोना रोगाच्या रुग्णांचा
आकडा ३४२ इतका आहे. भारतात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पहिला मृत्यू दि.१२
मार्च २०२० रोजी कर्नाटक राज्यातल्या कलबुर्गी जिल्ह्यात ७६ वर्षाच्या वृद्धाचा झाला. दुसरा
१३ मार्च २०२० रोजी दिल्लीतील एका वृद्ध महिलेचा झाला.
महाराष्ट्रामध्ये
कोरोना व्हायरस
महाराष्ट्रामध्ये दिनांक २२ मार्च २०२० पर्यंत ७४ ( कोरोना
ताजी माहिती) कोरोना रुग्ण आढळले
आहेत. महाराष्ट्रामध्ये दिनांक २३ मार्च २०२० पर्यंत ३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
महाराष्ट्रातील इतिहासात प्रथमच सर्व महत्वाची देवस्थाने बंद ठेवण्यात आली आहेत.
कोरोना
व्हायरसपासून (COVID-19) कशी काळजी घ्यायची
·
स्वच्छ हात धुवा.
पाणी आणि साबणाने ४० सेकंद हात धुवा. जर तुम्ही अल्कोहोल असणारं
हँड वाॅश वापरत असाल तर २० सेकंद पुरेसे आहेत. जर तुमचा हात अस्वच्छ असेल किंवा
मातीमुळे खराब झाला असेल तर साबण आणि पाण्याचाच वापर करा.
·
हातरुमाल किंवा
टिश्यू पेपरचा वापर करा.
खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोंडावर रुमाल ठेवा. रुमाल नसेल
तर टिश्यू पेपरचा वापर करा. अन्यथा हाताच्या कोपराखाली खोकू शकता. टिश्यू पेपरचा
वापर केल्यावर तो तात्काळ बंद कचरापेटीत फेकून द्या.
·
तोंड, नाक चेहरा, डोळे यांना स्पर्श
करू नका.
कोरोना वायरस लोकांच्या थुंकीतून एखाद्या पृष्ठभागावर पडू शकतो.
नकळत आपला हात त्या पृष्ठभागाला लागू शकतो. त्यामुळे तोंड, नाक चेहरा, डोळे यांना स्पर्श
करू नका.
·
कमीत कमी तीन
फुटाचे अंतर.
समोरच्या व्यक्ती सोबत बोलत असताना त्याच्यापासून कमीत कमी तीन
फुटाचे अंतर ठेवा.
·
आंबट चवीच्या
फळांचा आहारात समावेश.
कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा द्यायचा असेल तर आपली रोगप्रतिकारक
क्षमता चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे.यासाठी आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश
करणे गरजेचे आहे. यामध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. [४]
'व्हायरस' हा मध्यवर्ती विषय असलेले इंग्रजी
चित्रपट
·
The Andromeda Strain (१९७१). (Michael Crichtonच्या कादंबरीवर आधारलेला चित्रपट)
·
Carriers (२००९)
·
Contagion (२०११)
·
The Flu (२०१३) : H5N1 या विषाणूवरील साऊथ कोरियन चित्रपट
·
The Happening (२००८)
·
I am Legend (२००७)
·
Outbreak (१९९५)
·
Pandemic (२०१६)
·
12 Monkeys (१९९५)
कोरोना व्हायरसचा
उल्लेख असलेले पुस्तक
·
१८८१ साली प्रकाशित
झालेल्या 'The Eyes of Darkness'
या Dean Koontz[५] लिखित कादंबरीत वूहान-४०० या विषाणूची कल्पना मांडली आहे. पण यात
या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे व लक्षणांचे वर्णन कोरोनापेक्षा पूर्ण वेगळे आहे.
समाजमाध्यमांवर मात्र या उल्लेखाचा दुरुपयोग करून 'चीन हा देश कोरोना व्हायरस हे जैविक
हत्यार म्हणून वापरण्यासाठी विकसित करत आहे' अशी खोटी बातमी पसरवली जात आहे.[६]
'व्हायरस' या विषयावरील कादंबऱ्या
·
The Andromeda Strain
(Michael Crichton)
·
The Scarlet Plague
(Jack London)
·
The Stand (Stephen
King) (या कादंबरीवर १९९४ साली अमेरिकेच्या
दूरचित्रवाणीवर मालिका निघाली होती.).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा