कल चाचणी व अभिक्षमता चाचणी २०१८-२०१९
संपूर्ण मार्गदर्शन
कल चाचणी व अभिक्षमता
चाचणी
कल चाचणी ही एक मानसशास्त्रीय
कसोटी आहे. जी विद्यार्थ्याना करिअर निवडीसाठी १० वी नंतर सामान्यत: उपलब्ध असलेले
७ क्षेत्र म्हणजे कृषी, ललित कला, वाणिज्य, तांत्रिक, कला, गणवेशधारी सेवा, आरोग्य
विज्ञान यातील आपली आवड ओळखण्यास मदत करते.
अभिक्षमता चाचणी
विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखण्यास मदत करू शकते. खालील ४ क्षमतांचे मापन
“ अभिक्षमता चाचणी ” द्वारे
केले जाते.
१) भाषिक क्षमता (Verbal Ability)
भाषेवर प्रभुत्व असणे.
२) तार्किक क्षमता (Logical Ability)
विषयाचा खोलवर अभ्यास करणे.
३) सांख्यिकीय क्षमता (Numerical Ability)
आकडेमोड, बेरीज वजाबाकी करणे.
४) अवकाशीय क्षमता (Spatial Ability)
द्विमिती, त्रिमिती ज्ञान, भौतिकशास्त्र – भूमितीमधील मुलभूत संकल्पना समजून
घेणे.
सध्या कल चाचणी करिता शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे तेव्हा कल
चाचणी हा विषय शिक्षक मित्रांना पूर्ण पणे ज्ञात असणे आवश्यक आहे त्या अनुशंघाने
घेतलेला मागोवा व पुढील कार्यवाही बाबतची संकलित माहिती!
अभिक्षमता/कल चाचणी कशासाठी?
शिक्षणमंत्री श्री. विनोदजी तावडे यांनी अभिक्षमता कलचाचणीसंदर्भात नुकत्याच
केलेल्या घोषणेमुळे अभिक्षमता किंवा कलचाचणी हा विषय चर्चेत आला. त्यांनी
सुचविलेल्या पध्दतीने कलचाचणी घेता येणे व
त्यानुसार विद्यार्थ्यांना समुपदेशनासह अहवाल देणे शक्य होणार का? हा खूप वेगळा विषय आहे पण प्रत्यक्षात अभिक्षमता चाचणी म्हणजे काय? ती कोणी व कोणाकडून करुन घ्यावी/ ती कशी असते? ती कधी व का घेतली जावी?
अशी माहिती आजचे किती पालक घेऊ इच्छितात हे अधिक महत्त्वाचे आहे.
अशी माहिती आजचे किती पालक घेऊ इच्छितात हे अधिक महत्त्वाचे आहे.
इ. १० वी पर्यंतचे मूलभूत शिक्षण झाल्यावर वेगळ्या अभ्यासक्रमाची निवड करताना अजूनही कित्येकजण
निकालातील गुणांवरच हा निर्णय घेतात.
मार्कांच्या शर्यतीत आपला पाल्य पुढे जावा, त्याला मार्क चांगले असतील तर शास्त्र शाखेत प्रवेश मिळावा, थोडे कमी
असतील तर वाणिज्य शाखेत म्हणजे आपल्याला समाधान व शांती मिळेल एवढीच माफक अपेक्षा बहुतेकांची असते. पण नंतर सुरु होते विद्यार्थ्यांची खरी परीक्षा! आपल्या व आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत, आपल्याला करता येत नाहीयेत या जाणीवेतून येणारे नैराश्य, स्वतःची होणारी दमछाक मग काहीच न करणे किंवा नको त्या मार्गाला जाणे यात कधी रुपांतरित हाते ते कळतही नाही मग विसंवाद व निराशा यांनी घर व्यापून जाते.

हे सर्व टाळायचे असेल तर वेळेवर म्हणजे इ. १० वी च्या सहामाही किंवा वार्षिक परीक्षेनंतर ही कल
चाचणी प्रशिक्षित व्यक्तीकडून करुन घेणे चांगले. इ. १० वी नंतर पदवीपूर्व
परीक्षेपर्यंतही ही चाचणी घेता येते. व्यावसायिक शिक्षणासाठीच्या प्रवेशासाठीच्या
किंवा नोकरीसाठीच्या अभिक्षमता चाचण्या वेगळ्या प्रकारच्या असतात.
ही कल चाचणी पेपर पेन्सिल पध्दतीने किंवा संगणकीय पध्दतीनेही घेतली
जाते. या चाचणीसाठी कोणत्याही विशेष तयारीची गरज नसते. आतापर्यंत विकसित झालेल्या
क्षमतांची चाचपणी या चाचणीद्वारे केली जाते.
विद्यार्थ्यांचा स्वाभाविक व वैचारिक कल व या क्षमता त्याला
कोणत्या अभ्यासासाठी उपयुक्त होऊ शकतील व त्याला प्रगतीपथावर नेऊ शकतील याचे
मार्गदर्शन या चाचणीच्या सहाय्याने करता येते.
एखाद्या विषयाच्या अभ्यासासाठी आवश्यक असणा-या क्षमतांपैकी काही
क्षमता योग्य पातळी पर्यंत विकसित झाल्या नसतील तर त्यासाठी काय करता येईल याचेही मार्गदर्शन
करता येते. या अभिक्षमता चाचणीतून विद्यार्थ्यांच्या आतापर्यंत विकसित
झालेल्या विविध अभिक्षमतांचा स्तर पाहिला जातो तसेच विद्यार्थ्यांचा स्वाभाविक व
वैचारिक कल पाहिला जातो कारण विद्यार्थ्याला मिळालेले गुण हे त्याची संपूर्ण
माहिती देतातच असे नाही. किंबहुना त्याच्या कित्येक क्षमता केवळ त्यामार्गाने समजूनही येत
नाहीत.
मानवी बुध्दी ही अनेकांगी असते. त्यांची माहिती झाली तरच योग्य दिशा मिळू शकते. हे समजण्यासाठी
ही चाचणी
अत्यंत उपयुक्त असते.
अत्यंत उपयुक्त असते.
* कल चाचणीतून पुढील क्षमतांचे आकलन होते-
१) सर्वसामान्य आकलनक्षमता- अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी
संकल्पनांचे आकलन होणे गरजेचे असते. त्यावर आधारित नवनवीन माहिती घेणे, ज्ञान मिळविणे शक्य होते.
२) तर्कविचारक्षमता - शालेय शिक्षण संपल्यावर पुढील अभ्यासक्रम
शिकत
असताना शालेय पातळीसारखे शिक्षकांवर अवलंबून रहाता येत नाही
त्याला स्वयं अध्ययनाची जोड द्यावीच लागते. स्वतः तर्कशुध्द विचार करणे, विश्लेषण करणे आवश्यक असते त्यासाठी ही क्षमता महत्त्वाची असते.
असताना शालेय पातळीसारखे शिक्षकांवर अवलंबून रहाता येत नाही
त्याला स्वयं अध्ययनाची जोड द्यावीच लागते. स्वतः तर्कशुध्द विचार करणे, विश्लेषण करणे आवश्यक असते त्यासाठी ही क्षमता महत्त्वाची असते.
३) अभाषिक स्मृती- भाषेच्या आधाराशिवाय निरीक्षण व अनुभवातून
शिकण्यासाठी ही क्षमता महत्त्वाची. भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र इ. साठी ही क्षमता आवश्यक असते.
शिकण्यासाठी ही क्षमता महत्त्वाची. भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र इ. साठी ही क्षमता आवश्यक असते.
४) अवकाशबोधन क्षमता - लांबी, रं*दी, खोली, अंतर, वेग इ. संदर्भात अंदाज बांधता येणे
यासाठी ही क्षमता विकसित असावी लागते. भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, शिल्पकला
इ. साठी या क्षमतेची आवश्यकता असते.
इ. साठी या क्षमतेची आवश्यकता असते.
५) भाषिक क्षमता - ही किमान स्तरावर प्रत्येकाचीच विकसित असणे
गरजेचे असते. लेखन, श्रवण, वाचन, भाषण यासाठी ही क्षमता उत्तम असावी
लागते.
६) अंकज्ञान - (साधी आकडेमोड) गणितीकौशल्य हे एक महत्त्वाचे कौशल्य
आहे. भाषिक कौशल्याप्रमाणे हे कौशल्यहि प्रत्येकाचे किमान स्तरावर
विकसित असावे लागते. या कौशल्यामुळे विचारकौशल्याचा विकास होतो. शास्त्र, वाणिज्य शाखांधील विषयांसाठी हे कौशल्य खूप आवश्यक असते.
विकसित असावे लागते. या कौशल्यामुळे विचारकौशल्याचा विकास होतो. शास्त्र, वाणिज्य शाखांधील विषयांसाठी हे कौशल्य खूप आवश्यक असते.
७) अंकस्मृती - या कौशल्यामुळे एकाग्रता वाढीस लागते. इतर
विषयातील पाठांतर कौशल्यहि वाढीस लागते. शास्त्र, वाणिज्य शाखांधील विषयांसाठी हे कौशल्य खूप उपयुक्त असते.
विषयातील पाठांतर कौशल्यहि वाढीस लागते. शास्त्र, वाणिज्य शाखांधील विषयांसाठी हे कौशल्य खूप उपयुक्त असते.
मित्रमैत्रीणींनो ....!
आपल्या सभोवतालचे वातावरण, सामाजिक संस्कृती, प्राधान्याचे
विषय,
मुलाची आवड यातून मुलांचे स्वाभाविक व वैचारिक कल बनत जातात.
मुलाची आवड यातून मुलांचे स्वाभाविक व वैचारिक कल बनत जातात.
अ) तात्त्विक व वैचारिक कल -
ज्ञानार्जनाची आवड, संशोधन,
अध्यापनाची आवड असणा-यांचा हा कल उत्तम असतो.
अध्यापनाची आवड असणा-यांचा हा कल उत्तम असतो.
ब) अधिक व्यावहारिक दृष्टी -
कशातून काय निष्पन्न होईल, व्यावहारिक लाभ कसे होतील हे लक्षात घेण्याचा कल उत्तम असेल तर अशा
व्यक्तिला वाणिज्य शाखेत गती असते.
क) कलात्मक -
कुठल्याहि कामात सौंदर्यदृष्टी ठेवण्याचा कल असणारे लोक
कलाक्षेत्रात यशस्वी होतात.
कलाक्षेत्रात यशस्वी होतात.
ड) सामाजिक कल -
आंतरव्यक्ति संबंध, दुस-यांच्या मनात काय चालले आहे याचे आकलन
असणा-या व्यक्ति सामाजिक क्षेत्रात रमतात.
असणा-या व्यक्ति सामाजिक क्षेत्रात रमतात.
इ) स्वामित्त्व -
समाजामध्ये काही विशिष्ट दर्जा मिळवणे, इतरांवर नियंत्रण
मिळवणे असा कल असणार्यांचा उत्तम प्रशासक व्यवस्थापक बनण्याकडे कल असतो.
मिळवणे असा कल असणार्यांचा उत्तम प्रशासक व्यवस्थापक बनण्याकडे कल असतो.
हे स्वरुप हे ज्ञानप्रबोधिनीच्या अभिक्षमता चाचणीचे आहे अन्य
चाचण्याहि थोड्याफार फरकाने अशाच असतात. या चाचणीतून समजलेल्या विविध अभिक्षमतांचा स्तर व विविध अभ्यासक्षेत्रे व त्यांना आवश्यक व अपेक्षित असणा-या अभिक्षमता यांचा साकल्याने विचार करुन विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन त्यानुसार मार्गदर्शन

सर्वसाधारणपणे पालक आपल्या पाल्याचे निरीक्षण करत असतात त्यामुळे
त्यांना अंदाज असू शकतो पण तरीही या चाचण्यांमुळे आपल्याला आपला पाल्य नेमका कुठे
आहे, त्याला कोणत्या गोष्टींवर अधिक लक्ष द्यायला पाहिजे इ. चे ज्ञान
होते. आपल्या इच्छांचा, स्वप्नांचा ताण न देता वस्तुनिष्ठपणे
पाल्याला विचार करता येईल, त्याच्यावरची जबाबदारी पेलण्याची
जाणीव त्याच्यात निर्माण होण्यास मदत होऊ शकते म्हणून शासनकर्त्यांनी
ठरविण्यापेक्षा आपणच स्वतः याकडे विचारपूर्वक दृष्टीने बघू या!
या चाचणीच्या बरोबर आवड- निवड, व्यक्तिमत्त्व व अभ्यास सवयी
व कौशल्ये अशा चाचण्या घेणेही अधिक श्रेयस्कर ठरते व निर्णय घेण्यास मदत होते.
व कौशल्ये अशा चाचण्या घेणेही अधिक श्रेयस्कर ठरते व निर्णय घेण्यास मदत होते.
!!! आपणास कल चाचणी व अभिक्षमता चाचणीसाठी शुभेच्छा !!!
(कल चाचणी व अभिक्षमता चाचणी २०१८-१९ साठी च्या संपूर्ण मार्गदर्शणासाठी कृपया डाव्या बाजूला महा करिअर मित्र या लोगो वर क्लिक करा)
(कल चाचणी व अभिक्षमता चाचणी २०१८-१९ साठी च्या संपूर्ण मार्गदर्शणासाठी कृपया डाव्या बाजूला महा करिअर मित्र या लोगो वर क्लिक करा)
Tarkik means
उत्तर द्याहटवा