!!! " सुस्वागतम मित्रांनो " माझ्या Blog वर आपले सहर्ष स्वागत आहे !!!

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

१९ ऑगस्ट म.वि.प्र.समाजदिन विशेष .....




१९ ऑगस्ट म.वि.प्र.समाजदिन  विशेष .....








                १९१४ मध्ये उदाजी मराठा वसतीगृहाच्या माध्यमातून रोपण केलेल्या बिजाचे आज वटवृक्षामध्ये रुपांतर झालेले आहे. " बहुजन हिताय, बहुजन सुखाय " या ब्रीदवाक्यातून शिक्षण  प्रसाराची गंगोत्री आज खेड्यापर्यत पोहचली आहे. समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी आज म.वि.प्र.समाज एक आदर्श संस्था म्हणून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नावारूपाला आलेली आहे. आज म.वि.प्र. ही केवळ शैक्षणिक संस्था नसून एक सामाजिक हित जोपासणारी, विशिष्ट प्रेरणेने झपाटलेली अशी सामाजिक संस्था आहे. शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर आज या संस्थेचा कारभार चालू आहे.
                  आज समाजदिनाच्या  निमित्ताने सर्व कर्मवीरांना विनम्र अभिवादन ! म.वि.प्र.च्या प्रगतीस  हातभार लावणाऱ्या सर्व ज्ञात व अज्ञात व्यक्तींचे आभार ! असेच सहकार्य व स्नेह आमच्या पाठीशी सदैव असू द्या ! धन्यवाद !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा