!!! " सुस्वागतम मित्रांनो " माझ्या Blog वर आपले सहर्ष स्वागत आहे !!!

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

      इ.१० वी पुनरचित अभ्यासक्रम पालक कार्यशाळा पूर्वतयारी बैठक 


                 
                                 
                                इ.१० वी पुनरचित अभ्यासक्रम पालक कार्यशाळा पूर्वतयारी बैठक संपन्न
                   
                                सकाळ वृत्तपत्र समूह व जिल्हा परिषद ,नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित इ.१० वी पुनरचित अभ्यासक्रमानुसार पालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यासंबंधीची  पूर्वतयारी बैठक आज दि. ३० ऑगस्ट २०१८ रोजी स.१० वाजता मा. नितीनजी बच्छाव सो. [शिक्षणाधिकारी (माध्य.)] यांचे दालनात संपन्न झाली.
                       १० वी पालक कार्यशाळा पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (माध्य.) मा. नितीनजी बच्छाव सो. हे होते. या बैठकीस सकाळ वृत्तपत्र समुहाचे युनिट व्यवस्थापक राजेश पाटील, राजेंद्र महाजन व अभिजित गरुड हे उपस्थित होते. प्रारंभी प्रा.प्रशांत शेवाळे (अधिव्याख्याता, डाएट ) यांनी  उपस्थितांचे स्वागत करून कार्यशाळा आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट करून सांगितली. सकाळ वृत्तपत्र समुहाचे युनिट व्यवस्थापक राजेश पाटील यांनी या कार्यशाळेविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली व संपूर्ण कार्यशाळेचे तालुकावार नियोजन केले. मा. नितीनजी बच्छाव सो. यांनी या कार्यशाळेचा उद्देश व त्याची फलिते सविस्तर सांगितली व कार्यशाळेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्यात आणि सर्वोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी दिनेश  पवार, प्रवीण खरे, विनीत पवार, प्रवीण पानपाटील, वाणी, भवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभारप्रदर्शन सुनील आहेर यांनी केले.



                                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा