!!! " सुस्वागतम मित्रांनो " माझ्या Blog वर आपले सहर्ष स्वागत आहे !!!

शनिवार, १४ एप्रिल, २०१८


बोधिसत्त्व
डॉ.बाबासाहेब आंबेडकर



           डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), बाबासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञकायदेपंडीतराजनीतिज्ञलेखक, समाज सुधारकतत्त्वज्ञभारतीय संविधानाचे शिल्पकारमानवी हक्कांचे कैवारीभारताचे पहिले कायदा व न्यायमंत्रीबौद्ध धर्म पुनरुत्थानक आणि स्वातंत्र भारताचे जनक होते.याशिवाय बहुआयामी असलेले डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञमानववंशशास्त्रज्ञशिक्षणतज्ज्ञ, बॅरिस्टर, जलतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानीअस्पृश्य, कामगार व स्त्रियांच्या अधिकारांचे पुरस्कर्ते होते.
आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते, सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑव्ह इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या, आणि कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील संशोधनासाठीचे एक विद्वान म्हणून प्रतिष्ठित झाले.[६] आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि भारताच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. १९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्मस्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील एक उच्च उपाधी प्रदान केली. इ.स. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीसह जगभरातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांचा जन्मदिवस आंबेडकर जयंती सुद्धा दरवर्षी भारतासह जगभरात साजरी केली जाते. इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय (द ग्रेटेस्ट इंडियन) या सर्वेक्षणात बाबासाहेब आंबेडकर विजयी ठरले आहे. तर इ.स. २०१४ साली कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकलेल्या एकूण विद्यार्थांमधून पहिल्या १०० बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात बुद्धिमान विद्यार्थी (फर्स्ट कोलंबियन अहेड ऑव्ह देअर टाइम) म्हणून घोषित केले आहे.



टोपणनाव:
बाबासाहेबबोधिसत्त्व, भीमा, भिवा, भीम
जन्म:
मृत्यू:
चळवळ:
नव-बौद्ध चळवळ व इतर सामाजिक चळवळी व सत्याग्रहे
शिक्षण:
पदव्या:
बी.ए., एम.ए., पी.एचडी., एम.एससी., डी.एससी., बार-ॲट-लॉ, एल.एल.डी., डी.लिट. (एकूण ३२ पदव्या)
संघटना:
अवगत भाषा:
कार्यक्षेत्र:
पत्रकारिता/ लेखन:
मूकनायक (१९२०)
बहिष्कृत भारत (
१९२७)
समता (
१९२८)
जनता (
१९३०)
प्रबुद्ध भारत (
१९५६)
पुरस्कार:
प्रमुख स्मारके:
धर्म:
प्रभाव:
प्रभावित:
वडील:
आई:
पत्नी:
अपत्ये:
स्वाक्षरी:
Dr.ambedkar signature.jpg

!! जयभिम !!                   !! जयभिम !!                   !! जयभिम !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा