प्रवीण पानपाटील
यांना राज्यस्तरीय टीचर इनोव्हेशन अॅवॉर्ड प्रदान
वणी / नाशिक :- येथील के.आर.टी. हायस्कूल, वणी येथील शिक्षक
प्रवीण विजय पानपाटील यांना नुकतेच त्यांनी सादर केलेल्या “ संगणकाच्या सहाय्याने इ. १० वी च्या
विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे अध्ययन सुलभ करणे व विविध मोबाईल अॅपच्या मदतीने
विद्यार्थ्यांना ऑनलाईन गृहपाठ देऊन त्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रोत्साहित करणे
” या नवोपक्रमास टीचर इनोव्हेशन अॅवॉर्डने
सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासन, रवी जे. मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, इंडीयन
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय.आय.एम.) अहमदाबाद, हनी बी. नेटवर्क व स्टेट
इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फांउंडेशन (सर फांउंडेशन), सोलापूर यांच्यातर्फे हा
पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या
नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या आधारावर ही निवड केली जाते. सोलापूर येथील सिंहगड
इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रीय एज्युकेशनल इनोव्हेशन कॉनफरन्समध्ये हे पारितोषिक
वितरण संपन्न झाले.
यावेळी पुणे येथील बालभारतीचे अधिकारी डॉ. अजयकुमार लोळगे, पुणे येथील
विद्याप्राधीकरणाच्या उपसंचालिका शोभा खंदारे, सोलापूर ‘सकाळ’ चे सहयोगी संपादक
अभय दिवाणजी, ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. अरविंद नातू, एम.के.सी.एल.चे कार्यकारी संचालक
विवेक सावंत, टी.सी.एम.चे मुख्य शास्रज्ञ विपुल शहा, उदय पाचपुरे, अरुण देशपांडे, गुजरात
येथील शिक्षण तज्ञ डॉ. भावेश पंड्या, एम.सी.ई.आर.टी.च्या गीतांजली बोरुडे, सर फांउंडेशनचे
राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे आदी मान्यवरांच्या
उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रवीण
पानपाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे म.वि.प्र.संस्थेच्या
सरचिटणीस निलीमाताई पवार, अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, म.वि.प्र.
दिंडोरी व कळवण तालुका संचालक दतात्रय पाटील, म.वि.प्र. शिक्षणाधिकारी एस.के.शिंदे,
शालेय समिती अध्यक्ष विलासराव कड, सर्व शालेय सदस्य, मुख्याध्यापक डी.बी.चंदन, उपमुख्याध्यापक
ढोकरे, पर्यवेक्षक एस.व्ही.खुर्दळ, ए.बी.ठुबे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ
व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
फोटो
सोलापूर: सिंहगड
इन्स्टिट्यूटमध्ये विवेक सावंत यांचे हस्ते राज्यस्तरीय टीचर इनोव्हेशन अॅवॉर्ड स्वीकारतांना प्रवीण
पानपाटील, शेजारी विपुल शहा, उदय पाचपुरे, अरुण देशपांडे, शंकर नवले, भावेश पंड्या
आदी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा